काल आमच्या इंदीचा वाढदिवस होता. ही इंदी म्हणजे आमच्या गाईचे वासरू
इंद्रायणी. हा ब्लॉग लिहिण्याचे कारण की एका वर्षापूर्वी तिच्या जन्मानिमित्त अचानक दोन दोन देवदूताची भेट झाली.त्यांनी आम्हांला जी काही मदत केली त्यामुळे काल आम्ही इंदीचा वाढदिवस साजरा करू शकलो. फार काही विशेष केलं नाही पण यानिमित्त त्या देवदूतांची फार आठवण आली. तिला
आणि तिच्या आईला म्हणजे एकादशीला वाचवणारे डॉक्टर ओळख नसतानाही फक्त एका हाकेवर
आमच्यासाठी धावत आले. त्याचे पद आणि त्याचे शिक्षण कशाचाही गर्व न करता हे डॉक्टर आपल्या पेशाला प्रामाणिकपणे निभावणारा हे देवदूत म्हणजे डॉ.अनिल आणि त्यांचे मित्र डॉ. तेजुरकर.
अगदी बरोबर एक वर्षापूर्वी २१ ऑगस्टला दुपारी बाराची वेळ असेल,
घरातील काम सुरु होते. तेवढ्यात आई अचानक आली आणि म्हणाली “एकादशी प्रसूतीकळा
देतेय आज नक्की डिलिवरी होणार.” डॉक्टरला फोन लावला तर ते अलिबागला गेलेले होते. आता
काय करायचं ? असा प्रश्न पडला. गाईची डिलिवरी कशी होते ? काय काळजी घ्यायची याची
फार माहिती नव्हती. डॉक्टरांनी पुढच्या महिन्यातील तारीख दिली होती म्हणून आम्ही निवांत होतो. पण अशा अडचणीच्या वेळी डॉक्टर गावी गेले तर कोणाला बोलवावं ते कळेना, गावात
सगळ्या अशा गोष्टी कशा हाताळायच्या ते माहिती असते. पण शहरात कोणालाच काही माहित नसतं, जवळपास गोठाही नाही, आम्ही सगळेजण टेन्शन मध्ये होतो. या गडबडीत एक सुंदर आणि गोंडस
वासरू या जगात येत होत. ते छोटेसे वासरे पाहून आमचा सगळा तणाव पाण्यात साखर विरघळावी तसा निवळला होता पण आनंदावर विरजण पडले आणि गाईचे डिलिवरी होताना तिचे आतडे बाहेर पडले.
तिची ही पहिलीच वेळ. कोणी अनुभवी माणूस नाही. आमची नुसती तारांबळ उडाली. बाबाच्या
एका मित्राला बोलवायला कोणी तरी गेलं पण त्यांना येण्यासाठी उशीर झाला तोपर्यंत गाय वेदनेने
सैरवैर करत होती. बाबा तिचे आतडे हातात घेऊन गाईच्या मागे धावत होते. आतड्याचे वजन ३०-४० किलो असेल किंवा त्यापेक्षा जास्त वजनाचे असेल. वेद्नेपुढे तिला काही कळत नव्हते म्हणून नुसती पळत सुटली
होती, बाबा तिच्या मागे पळून पळून दामले होते. डॉक्टरांनी फोनवर जवळ कोणी डॉक्टर
असेल तर त्याला बोलवा असे सांगितले पण जनावरांचा डॉक्टर वेळेवर काही केल्या
सापडेना. यामुळे आमची फजिती होणार असे लक्षात आले. वारंवार फोन केल्यावर आम्हांला
कोणी डॉक्टर भेटले नाही तुम्ही दुसऱ्या डॉक्टरचा नंबर देता का ? असे विचारल्यावर एका डॉक्टरचा नंबर दिला त्या डॉक्टरानी मला जमणार नाही असे सांगितले तर अजून एकजण म्हणाला “आलो
तरी अशा वेळी काही करता येत नाही, ते आतडे आत जाईल का प्रयत्न करा ते गेले तर ठीक
नाहीतर काही खरे नाही.” मग आमचा धीर सुटत चालला होता, आम्ही प्रयत्न करून ते आतडे
गाईच्या शरीरात टाकत होतो पण गाय तिला होत असलेल्या वेदनेमुळे कळा देऊन आत गेलेले
आतडे बाहेर टाकत होती. यावेळी मात्र गायची ताकत एखाद्या हत्तीसारखी वाटत होती . या अत्यंत
कठीण परिस्थितीला सामोरे कसे जायचे समजत नव्हते. आज इंदी एका वर्षात तिच्या आईसारखी दिसत आहे पण त्यावेळी मात्र दोघी मायलेकी वाचतात की नाही असे वाटत होते.
अचानक लक्षात आले की शेजारी रेसकोर्स आहे तिथे
घोड्याचे डॉक्टर असतील. मी गाडी काढली शेजारच्या रेसकोर्सला पोहचले तेव्हा कळाले
डॉक्टर तर दुसऱ्या रेसकोर्सला असतात तिकडे गेले तर तीन –चारी गेट फिरल्यावरही डॉक्टर
काही भेटेना. मग रखवालदाराला परिस्थिती सांगून विनंती केली त्यांनी सांगितले छोटे डॉक्टर
काही माहिती नाही पण आत मोठे डॉक्टर बसलेत. मी धावत दवाखान्यात गेले आणि समोर
बसलेल्या डॉक्टर त्यांनाच सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी विचारलं “
तुमचा डॉक्टर कुठे ?” ते बाहेरगावी गेले म्हणूनच तुमची मदत हवीय अशी मी विनंती केली.
त्यांनी लगेच एकजणाला गाडी काढायला सांगितली “सगळं समान घे बोलले “. माझा तर विश्वास
बसेना. मी पुढे पुढे आणि डॉक्टरची गाडी मागे , हे दृश्य पाहून रेसकोर्समधील लोक माझ्याकडे
आश्चर्याने बघत होते, त्या दिवशी सुट्टी होती म्हणून माझा अवतार फार बिघडलेला होता म्हणून लोक अधिक
बघत ही कोण? रेसकोर्समधील सर्वात वरिष्ठ डॉक्टर का हिच्याबरोबर जात आहेत. असा प्रश्न त्यांच्या तोंडावर दिसत
होता. पण घरी सगळं ठीक असावं अशी प्रार्थना करत होते. इतक्या लांबून डॉक्टर घेऊन
जाते पण .... असा मनात उगाच शंका येत होती. अगदी ३-४ मिनिटांच अंतर कोसभर वाटू
लागले. मी डॉक्टरांना घेऊन आले आहे हे पाहून आई-बाबांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
डॉक्टरांनी घरी पोहचताच कामाला सुरुवात केली, अंगावर किती
महाग कपडे आहेत याची काळजी न करता त्या मातीत आणि चिखलात गाईचे उपचार सुरु केले.
पुढील अर्धा- एक तास नुसती पळपळ सुरु होती. गाई पळून पळून दमली होती. ती उपचारांना
प्रतिसाद देत नव्हती आणि अजून वासराला दुध ही पाजले नव्हते. त्याला जवळ घेणे तर
लांबच होत. डॉक्टरानी आपले काम सुरु केल्यामुळे आमची नुसती बघ्याची भूमिका उरली होती.
ते डॉक्टर घोड्यावर उपचार करत असल्यामुळे गाईची ही परिस्थिती त्यांच्या हाताबाहेरची आहे असे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गायीला भुलीचे इंजेक्शन देऊन शांत केले. आणि त्यांचा खास मित्र आणि गाईचा
विशेषज्ञ डॉ. तेजूरकर त्यांना फोन केला आणि लवकर ये सांगितले. इकडची सगळी
परिस्थिती सांगितली. डॉ. तेजुरकर उरुळीकांचनला होते पण मित्राचा फोन आला म्हणून ते डॉक्टर
येण्यासाठी तयार झाले. पोहचण्यासाठी एक तास लागणार होतो.
तोपर्यंत गाईने हिंमत सोडू नये असे वाटत होते.
डॉक्टराला सगळी परिस्थितीची माहिती असून ते आम्हांला धीर देत
होते. सगळं ठीक होईल. तो एक तास आम्ही युगासारखा काढला. तोपर्यंत वासरू डोळे
उघडून आईकडे पाहू लागले. जागेवरून उठण्याचा प्रयत्न करत होते पण आईचा स्पर्श आणि
दुधाशिवाय ते शक्य नव्हत. आमचा जीवही त्यांच्याबरोबर तुटत होता पण काहीच मार्ग नव्हता.
डॉक्टरानी शक्कल लढवली की गाईचे झोपलेल्या अवस्थेत दुध काढून पिलाला द्यायचे आणि तसं
केलंही त्यामुळे १०-१५ मिनिटात वासरू उभं राहिलं. त्यावेळी आम्ही आनंद आणि दुख एकत्र
अनुभवत होतो.
तेवढ्यात डॉ. सावंत आले, आम्ही त्यांनाही आम्ही फोन केला होता.
त्यांनी परिस्थिती पाहून प्रयत्न करू बोलले आणि काम सुरु केले. ते ज्या प्रकारे गायीला इंजेक्शन देते होते ते पाहून डॉ. अनिल आणि सोबत आलेले डॉ. म्हणाले की जनावर असले तरी तय्ना जीव आहे जरा जपून प्रेमाने द्या. असे तर दुसऱ्या देशात केले तर तुमची पदवी काढून घेतील. यामुळे ते दोघे किती संवेदनशील डॉ आहेत याची जाणीव झाली. डॉ. सावंतचा अनुभव परिस्थिती सांभाळायला कमी पडत होता, त्यांना जमणार नाही हे लवकरच लक्षात आले. मग काय करावे सुचत नव्हते,तेवढ्यात एक गाडी वाजली, डॉ. तेजूरकर आले. वाऱ्याच्या
वेगाने आले त्यांनी २० -३० मिनिटात जी काही मेहनत घेतली त्यावर आम्ही सगळे आवक
झालो. कामाचा वेग, कामाचे ज्ञान आणि मेहनत यांचे एकत्रित मिश्रण म्हणजे डॉ.
तेजूरकर. अक्षरशः धावत येऊन अंगावरील शर्ट काढला आणि कामाला लागले मित्राला नीटसे
बोललेही नाही. लगेच त्या चिखलात बसून उपचाराला सुरुवात केली. वारा लागल्यामुळे आतडे सुजले होते, डॉक्टर जीवानिशी
प्रयत्न करून गायीच्या शरीरात आतडे बसवत होते पण गाईला होणारा त्रास त्यामुळे ती
बाहेर काढून टाकत या सगळ्या प्रकारामुळे एकादशीचे मोठ्या प्रमाणत रक्त वाया गेले. त्यामुळे ती फार अशक्त
झाली होती. तिने प्रयत्न सोडायच्या आत सगळं ठीक व्हावं म्हणून आम्ही देवाचा धावा
करत होतो पण खरतरं दोन दोन डॉक्टररुपी देव आमच्या गाईला वाचवत होते. अखेरीस गायीच्या शरीरात सगळे आतडे बसवून त्याला टाके टाकून परिस्थिती नियंत्रणात आणली. याच दरम्यान तिला सलाईन दिले
जात होते म्हणून तिला थोडीशी ताकत मिळाली. या ताकतीने तिने टाके तोडू नये असे डॉक्टराना वाटत होते. या सगळ्यात आमची एकादशी अर्धमेली झाली होती. अशक्तपणामुळे
जमिनीवर निपचित पडली होती. अर्धा तासांनी तिला शुद्ध आली ती वासराकडे पाहू लागली. वासरू
तिच्याकडे जातच तिन्हे पान्हा सोडला आणि आम्ही सुटकेचा श्वास ....
अशा प्रकारे दोन देवदूतांनी आमच्या एकादशीचा आणि इंद्रायणीचा जीव वाचवला. डॉ. अनिल यांनी उपचाराचे आणि आणलेले साहित्य कशाचेही पैसे घेतले नाहीत. फक्त डॉ.तेजुरकारांची फी द्या. अजून काही साहित्य हवे असेल तर सांगा पाठवून देतो असे म्हणाले. या सगळ्या गडबडीत आम्ही रेसकोर्समधून आलेल्या डॉक्टरच नावं विचारयचं राहून गेलो होतो तेव्हा त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तीला विचारले या डॉ.चे नाव काय ? तेव्हा त्याने सांगितले की हे रेसकोर्समधील सर्वात मोठे डॉक्टर आहे त्यांना सगळे नाव डॉ. अनिल म्हणतात.अधिक चौकशी केल्यावर कळाले की रेसकोर्समधील सर्वात वरिष्ठ डॉ. आहेत. एवढे मोठे डॉक्टर ओळख नसतानाही फक्त एका विनंतीवरून आमच्या गायीसाठी आपले काम सोडून आले. याचे आम्हांला फार आश्चर्य वाटत होते. त्यात त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि आपल्या पेशाविषयी असलेला आस्था दिसत होती.
आम्ही त्यांचे आभार मानत असतात त्यांनी सांगितले धन्यवादची काही गरज नाही हे तर माझे कर्तव्य आहे. मी डॉक्टर आहे जर एखादे जनावर अडचणीत असेल तर त्याला मदत करणे माझं कामच आहे. मग तो रेसकोर्समधला घोडा असो वा तुमची गाय. डॉ. गेल्यावर आम्ही देवाचे आभार मानू लागलो की वेळेवर जर डॉ आले नसते तर आम्ही एकादशी आणि इंदी गमवून बसलो असतो. डॉक्टराच्या उपकाराने आम्ही भारावून गेलो होतो.
आम्ही त्यांचे आभार मानत असतात त्यांनी सांगितले धन्यवादची काही गरज नाही हे तर माझे कर्तव्य आहे. मी डॉक्टर आहे जर एखादे जनावर अडचणीत असेल तर त्याला मदत करणे माझं कामच आहे. मग तो रेसकोर्समधला घोडा असो वा तुमची गाय. डॉ. गेल्यावर आम्ही देवाचे आभार मानू लागलो की वेळेवर जर डॉ आले नसते तर आम्ही एकादशी आणि इंदी गमवून बसलो असतो. डॉक्टराच्या उपकाराने आम्ही भारावून गेलो होतो.
आणि एकादशी आणि इंद्रायणी या मायलेकींचा संगम पाहतच राहिलो.
Mast lihilay Prayaga Tai :)
ReplyDeleteThank you arpita ...
ReplyDeleteतुझा लेख वाचुन मन हेलकावून गेलं. खुप सुंदर लिहिले आहेस..
ReplyDeleteतुझा लेख वाचुन मन हेलकावून गेलं. खुप सुंदर लिहिले आहेस..
ReplyDeleteThank you varsha , तुमच्या अशा प्रतिक्रियामुळे लिहिण्यास प्रेरणा मिळते. पुढच्या महिन्यात आपल्या लंडन ट्रीपविषयी लिहिणार आहे तुझी मदत लागेलच...
ReplyDelete