नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा : रोहिणी कवाडे
मांगलेकर
लहानपणापासून चार भावंडामध्ये रोहिणीला अभ्यासात
मध्यम गती होती. तरीही वडिलांना मात्र रोहिणी सर्वांपेक्षा वेगळी आहे असे वाटत
होते. दहावीनंतर कॉमर्स घ्यायला निघालेल्या रोहिणीनी वडिलांच्या सांगण्यावरून
मॉकनिकल इंजिनिअरच्या डिप्लोमाला ऑडमिशन घेतले. खूप अभ्यास करून उत्तम मार्कांनी
डिप्लोमा पूर्ण केला. कॉलेज झाल्यानंतर निलेश मांगलेकर यांच्याशी प्रेमविवाह झाला.
लग्नानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या. तिथे एका कंपनीत नोकरी करीत असताना
मार्केटिंग काम जवळून पाहत आले. पुढे काही दिवसांनी पतीची बदली दिल्लीला झाली
तेव्हा त्यांच्याच कंपनीत रोहिणी मार्केटिंगमध्ये रुजू झाल्या. तिथे सॉंफ्टवेअर
मार्केटिंगची जबाबदारी सांभाळत असताना त्यांना विक्रीचा चांगला अनुभव मिळाला. काही
काळ काम केल्यावर पती-पत्नीला मातृभूमीची त्यांना
आठवण येत होती तसेच दोघेही कामात फार समाधानी नव्हते. तेव्हा मात्र स्वत:चे
काहीतरी करू असा विचार करून नोकरी सोडून कोल्हापूरला आले.
पुण्यात अनेक आय टी कंपन्या आहेत म्हणून त्यांनी
कोल्हापूरला काम सुरु केले. स्वत: पती –पत्नी आणि एक नोकर तसेच काही तुटपुंजी
गुंतवणूक यावर काम सुरु करण्यात आले. आज त्यांच्याकडे चाळीस कर्मचारी असून पुणे ,
कोल्हापूरला असे दोन ऑफिस आहेत. तसेच अन्य काही जिल्ह्यात जसे सांगली , सातारा त्यांची
कामे सुरु आहेत. सुरुवातीच्या काळात कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे आणि
प्रोजेक्टसाठी सहकार्य करणे. तसेच सामन्य लोकांना आयटी सर्व्हिस देणे सुरु केले. त्यांनी
आय टीच्या विविध क्षेत्रात काम सुरु होते. त्याचवेळी लक्षत आले की कोल्हापूरला रिवर्स
इंजिनिअरिंग मध्ये सर्व्हिस देणारी कंपनी नाही .तेव्हा कोल्हापूरमध्ये अशा
प्रकारची सर्व्हिस देणारी त्यांनी पहिली कंपनी सुरु केली. त्यासाठी त्यांनी मशिनरी
घेतली. फक्त तीन लाख गुंतवणूक केलेल्या त्या कंपनीचा आज दोन कोटी टनओवर झाला आहे.
रिवर्स इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये चांगला जम बसल्यावर
त्यांनी बाकीच्या सर्व्हिसकामे आणि मुलांचे प्रशिक्षणवर्ग बंद केले. कारण
प्रशिक्षणवर्ग संध्याकाळी असायचे त्यामुळे रात्री उशीरपर्यंत काम करावे लागत असे. पुन्हा
सकाळी ऑफिस आणि संध्याकाळी प्रशिक्षणवर्ग यामुळे कामाचा प्रचंड ताण जाणवत
असल्यामुळे प्रशिक्षणवर्ग बंद करून पूर्ण वेळ रिवर्स इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये
लक्ष द्यायचे ठरवले. कोल्हापूरला काही कंपन्या बाहेरून सर्व्हिस घेत असत . अनुभवी
लोक नसल्यामुळे अनेक सर्व्हिसेस आउटसोर्स करत होते तेव्हा रोहिणीताईच्या कंपनीने
त्या कंपनीला आत्मविश्वास दिला की आउटसोर्स करण्यापेक्षा आम्ही तुमची कामे करून
देतो. उत्पादन आणि इंजिनिअरिंग संदर्भातील अन्य कामे रोहिणीताईच्या कंपनीने करायला
घेतली. यामुळे त्यांच्या कामाने वेळ घेतला. आणि कामे मोठ्या प्रमाणात सुरु झाले .
त्यांना नेहमी वाटायचे की आयटी क्षेत्र खूप वाव आहे,
पण काही करायला संधी मिळत नव्हती. दोन वर्षापूर्वीपासून देशात आयटी क्षेत्राला चांगले
दिवस आले तेव्हापासून त्यांनीही मात्र या क्षेत्रात उतरायचे ठरवले. आतापर्यंत जे
काम करत होत्या त्यापेक्षा वेगळे असल्यामुळे त्यांनी पुण्यातील एका संस्थेशी भागीदारी
करून ‘श्रीनेम टेक्नोलॉजी’ नावाने कंपनी सुरु केली त्याअंतर्गत सर्वसामान्य लोकांना
आयटीशी निगडीत समस्यावर उपाय उपलब्ध करून द्यायचे. त्यासाठी मोबाइल ऑप्लिकेशन
बनवणे, सेल्स, ट्रेनिंग, आणि गरजेनुसार त्यांना सुविधा पुरविणे अशा रीतीने कंपनीचे
काम सुरु आहे.
रोहिणीताईला स्वत:ला सेल्समध्ये
जास्त रस आहे म्हणून त्यांनी इंजिनिअरिंग केले तरीही त्यात काही रमल्या नाही. एक
बिजनेसमॉन म्हणून त्या स्वत:ला जास्त सक्षम मानतात. त्यानुसार कामही करतात.
म्हणूनच पाच वर्षात त्यांनी एवढी प्रगती केली आहे. आर्थिक समस्यावर मात करून
त्यांनी आज स्वता:ला सिद्ध केले आहे. एक शांत व लाजाळू मुलगी ते आज एक बिजनेसवूमन
असा प्रवास करताना त्यांच्यात अनेक बदल झाले. त्यामुळे त्यांची सामाजिक आणि आर्थिक
उंची वाढली म्हणूनच त्या एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला येत आहेत.
No comments:
Post a Comment