नऊ दिवस नऊ देवी – आगळा वेगळा नवरात्रउत्सव
उद्यापासून नवरात्र सुरु होत आहे. नऊ दिवस सगळे आपल्या आराध्य देवीची पूजा करतात,
आमच्या गावाला आमच्या वाड्यात देवी बसते म्हणून कधी घरी देवी बसली नाही. जसा
गणपती बसतो तशी देवी का नाही असा विचार
लहानपणी फार यायचं , वाढत्या वयानुसार का नाही याचं उत्तर मिळालं, त्याचबरोबर देवावर
श्रद्धा ठेवत , मला नेहमी मदत करणारी व्यक्तीच माझ्यासाठी देव झाली. त्या सगळ्या
लोकांना खूप मानते, काहींना प्रत्यक्ष भेटून सांगता आले नाही पण त्यांच्याविषयी आजही
खूप आदर आहे, त्यातही स्त्रीला निसर्गाने किंवा देवाने असेल विशेष गुणधर्म दिले
आहेत, त्यामुळे माझ आयुष्य घडवण्यात स्त्रियांचा मोठा आणि अनमोल वाटा आहे. खरतर
काही महिलांनी माझं आयुष्य खूप सुधारले आहे . त्यांना धन्यवाद बोलावे असे वाटत
असताना तशी वेळ काही कधीच आली नाही. सगळेजण नवरात्र साजरी करतात आपण ही करावी नऊ दिवस
नऊ देवींची पूजा करून म्हणजे आपल्या आयुष्यातील नऊ देवीच्या विषयी लिहून त्यांचे
आभार मानावे निदान काहींच्या आठवणी जाग्या कराव्या, मला नऊ दिवस उपवस काही जमणार
नाही आपल्याला जे जमत ते थोडेफार लिखाण , मग ठरवले आपण आपल्या पद्धतीने नवरात्र साजरी करायची, जन्मापासून
ते आज तागायत माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या स्त्रियांनी मला या खूप शिकवले किंवा
काहीतरी दिले त्यामुळे माझं सुधारले. अश्या स्त्रियांच्या कार्याची जगाला ओळख करून
दिली तर माझा वेगळा नवरात्र उत्सव होईल. जर माझ्या आयुष्यात आल्या नसत्या तर मी
इथे नसते. आज फार मोठी व्यक्ती नाही किंवा
नाव कमावले नाही पण तरीही जे कमावले आहे ,ते या स्त्रियांच्या सहकार्यामुळे.
आयुष्यात फक्त स्त्री नाही तर पुरुष आहेत त्यांनी मला सहकार्य केले त्यांचा
लेखाजोखा पुन्हा काहीतरी.
तर उद्यापासून रोज एका स्त्रीची कहाणी , खरतर कहाणी शब्द फार फिल्मी
वाटतो त्यापेक्षा माहिती इथे वाचायला
मिळेल , तुम्हाला पण मला भेटलेल्या स्त्रियांना भेटून अप्रत्यक्षपणे
का होईना छान वाटेल.
No comments:
Post a Comment