यशोधा मैय्या..... हजारो मुलींची एकचं आई
जन्म देते ती आई आणि
आपल्याला घडवते ती यशोधा माता पण सगळ्यांना अशी संधी मिळते असे नाही, मला आणि लीला
पूनावाला फाउंडेशनमधील सगळ्या मुलींना ही संधी मिळाली. आम्हा सगळ्या मुलींना
जन्मदाते आई –वडिल आणि घडवणारे आई –वडील असे दोन्ही लाभले आहेत. त्यामुळे अहो थोर
भाग्य आमचे. पदवीचे शिक्षण सुरु असताना सामाजिक क्षेत्रात काम करायची इच्छा
निर्माण झाली. कॉलेजने दिलेल्या एका संधीमुळे सामाजिक इंटरशिप करताना लक्षात आले,
की समाजात चांगले आणि समाज कल्याणाचे काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. पण त्यांना
प्रसिद्धी मिळत नाही. जर प्रसिद्धी मिळाली तर समाजातील जास्तीत जास्त लोकांना लाभ
मिळेल, यासाठी आपण काहीतरी करावे म्हणून अनेक पर्याय शोधात असताना पत्रकारिता हा
उत्तम मार्ग आहे असे लक्षात आले. आपण पत्रकार म्हणून करियर करायचे ठरले, त्यावेळी
माझ्याकडे कसली माहिती नव्हती, कॉलेज कुठे ? फी किती असेल आणि बरेच प्रश्न होते
तरीही कॉलेज संपल्यावर प्रवेश मिळवण्यासाठी शोधाशोध सुरु केली. रानडे इन्स्टिट्यूट
सर्वोत्तम पर्याय आहे असे समजले. परंतु जाचक अटी आणि प्रवेशपरीक्षा यासंदर्भातील
अपुरी माहिती यामुळे मला रानडेत प्रवेश मिळाला नाही. माझ्या करीयरच्या दिशेने
टाकलेलं पाहिलं पाऊल त्याला सुरुवातीलाच ठेस लागली होती, मग खाजगी कॉलेजची चौकशी केली
तर फी भरमसाट होती. घरच्या परिस्थितीमुळे काय करावे असा प्रश्न पडला असताना लीला
पूनावाला फाउंडेशनची सकाळमध्ये जाहिरात पहिली. जाहिरातीनुसार गरजू मुलींना
शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मी ताबडतोब फोन केला आणि दुसऱ्या दिवशी जाऊन
फार्म भरला, तिथले वातावरण पाहून माझ्या स्वप्नांना दिलासा मिळाला. खाजगी कॉलेजचा
शोध सुरु असताना एम.एम.सी. कॉलेजमध्ये प्रवेश नक्की झाला. परंतु मोठ्या फीचा आकडा
पाहून आणि आतापर्यंत जवळपासच्या कोणी असे काम करत नाही ,नोकरी मिळेल का अश्या
प्रश्नांनी घरातून मला विरोध होऊ लागला. पण मी काम करून कॉलेज करते आणि फीतील काही
रक्कम स्वत: जमा या विश्वासावर मला कॉलेजला प्रवेश घ्यायची परवानगी मिळाली.
तोपर्यंत लीला पूनावाला फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली नव्हती. एके दिवशी फोन आला
की मला शिष्यवृत्ती मिळाली आहे. वेगळ्या करीयरची संधी मिळणार म्हणून मी खूप आनंदी
होते. शिष्यवृत्तीसाठी मुलाखतीचा फेरी असते, त्यावेळी फिरोज पूनावाला आणि लीला
पूनावाला यांची भेट झाली. त्यांना सगळ्या मॉम- डॉड म्हणतात. मला विश्वास वाटायला
लागला की आता आपले भविष्य सुरक्षित झाले. माझ्या हसमुख चेहऱ्याची पहिल्यांदा डॉडने
स्तुती केली. घरातील माणसापेक्षा कोणीतरी आपुलकीने बोलणारे भेटले अशी जाणीव झाली.
शिष्यवृत्ती वितरण समारंभ
आयोजित केला होता त्यात प्रमुख पाहुणे म्हणून मा. राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम
येणार असल्याचे कळले , माझा तर आनंद गगनात मावत नव्हता. मला शिष्यवृत्ती
मिळाल्याने पत्रकारितेतील करियरला पंख मिळाले होते त्याचबरोबर माझ्या आदर्श
व्यक्तीकडून ती मिळणर आणि त्यांना प्रत्यक्षात पाहायला मिळणार याची कल्पनाच फार
छान वाटत होती. भव्य –दिव्य समारंभामध्ये शिष्यवृत्तीचे वितरण झाले. राष्ट्रपतीला
भेटायची व बोलायची संधी मिळाली.
एक त्यांचा गुण मला सांगाव
लागेल काल सांगितले तसे सकाळमध्ये निवड झाल्यामुळे खूप निराश होते. फाउंडेशनच्या
ऑफिसला सकाळ प्रकरणाची कल्पना दिली होती , निवड झाली नाही म्हणून सांगितल्यावर
निराश होऊ असा संदेश आला, मला सकाळमध्ये काम करायचे होते म्हणून मी त्यांना
विचारले की तुमच्या मदतीने काही करता येईल का? मला उत्तर नाही मिळाले, नाराज झाले पण त्यांनी जो संदेश
दिला तो खूप मौल्यवान होता , आज ही माझ्या चांगला लक्षात आहे, त्यानुसार काम करते.
त्या म्हणाल्या मी आता तुला आज नोकरीसाठी मदत केली तर त्याची किंमत राहणार नाही ,
तसेच आयुष्यभर तुला वाटत राहील की वाशिल्यावर नोकरी मिळाली, स्वता:च्या गुणवत्तेवर
नोकरी मिळव, आज सकाळने नकार दिला पुन्हा संधी मिळेल तेव्हा स्वता:ला सिद्ध कर.
तेव्हा हे पचवणे थोडं अवघड गेल. पण नंतर वेगळ्या प्रकारची संधी मिळाली. तेव्हा
मॉमचे बोल आठवले. तेव्हापासून मात्र सकाळने मला बोलवले नाही ती वेगळी गोष्ट.
मी फाउंडेशनच्या विविध
कार्यक्रमात सहभागी होत असे. तेव्हा पी.ए. (शांतीदूत)या उपक्रमाची माहिती मिळाली.
यामध्ये मुलींना इंग्लडमधील आशा सेंटर मध्ये प्रशिक्षणासाठी जात असत. आपल्याला ही
संधी मिळावी अशी इच्छा होती. दोन-तीन बॅच गेल्या होत्या. मी संधीची वाट पाहत होते. तेव्हा
मॉमने एकदा विचारले तू का नाही पी. ए साठी
अर्ज करत? मग काय एका मैत्रिणीच्या मदतीने अर्ज केला. माझे साहेबांच्या देशात जाण्याचे स्वप्न फळास
लागले. पासपोर्ट आणि बाकी सोपस्कार उरकून एक दिवस आम्ही चौदा मुली व मॉम-डॉडनी
आकाशात झेप घेतली. सकाळी उतरलो तेव्हा डोळे भरून आम्ही तिथलं जग पाहत होतो. आम्ही
सगळ्याजणी पहिल्यांदा विमानात बसलो होता, ते फक्त फाउंडेशनच्या खऱ्या अर्थाने
मॉम-डॉडच्या कृपेमुळे . त्यांनी आम्हाला वेळो-वेळी तिथली शिस्त समजावून सांगितली.
लोकांचे राहणीमान –खानपान अश्या बऱ्याच गोष्टींची माहिती दिली. विविध ठिकाणी
फिरायला गेलो. (याची सविस्तर माहिती पुढच्या वेळी ) यामुळे माझे ऑक्सफर्ड युनिवर्सिटी पहायचे स्वप्न पूर्ण झाले. आतापर्यंत फक्त
तिथले वर्णन चित्रपटात किंवा कोणाकडून ऐकले होते. त्या सगळ्या गोष्टी पाहायला व
अनुभवायला मिळत होत्या. मनोमन सगळ्याजणी दोघांचे आभार मानत होतो. पण प्रत्यक्षात
कसं बोलणार असा प्रश्न होता.
एका संध्याकाळी आम्ही सगळेजण
एका चायनीज हॉटेलमध्ये गेलो, लंडनमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण आम्ही वेगळे पदार्थ
खावे असा मॉम आग्रह करत होत्या. या हे खाद्यपदार्थ दुसरीकडे मिळणे कठीण असत तेव्हा
नक्की चव पहा असं अगदी आपुलकीने सांगत होत्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा एका नवीन
हॉटेलमध्ये गेलो. तेव्हा मोकळा वेळ होता म्हणून आम्ही तिथेच आमची गाण्यांची महफिल
भरवली होती, तिथल्या इंग्लिश बाबूंना ते जरा विचित्र वाटत होत पण आम्ही अगदी
मराठी- हिंदी गाणे छान रंगात येऊन गात होतो, आमची महफिल अगदी नाजूक वळणावर येऊन
थांबली, ते गाणं होत “ ये तो सच है की भगवान है, मगर फिर भी अंजान है, धरती पे
रूप मां-बाप का उस विधाता की पहचान
है....... हे गाणं गात असताना आम्ही सगळ्याजणी खूप भावूक झालो. आमच्या या
आई-बाबांना जाऊन बिलगलो. त्यावेळी आई-बाबांच्या डोळे पाणावले होते, आणि आमचं गाणं
आश्रूमय झालं होत. त्या इंग्लिश बाबूंना अगदी आनंदाने गाणाऱ्या रडायला का लागल्या
हे समजत नव्हतं, पण आम्ही गाणं पुर्ण म्हणेपर्यंत
आश्रुची लाट वाहू लागली होती.
या पुढे काय लिहू या
आईविषयी तिने खूप काही दिलाय, खूप शिकवलं आणि आजही ही प्रक्रिया सुरु आहे. धन्यवाद
बोलल्याने काही होणार नाही, तिची परतफेड भविष्यात तिच्याच कामातून प्रेरणा घेऊन काहीतरी
करायचा प्रयत्न असेल.
उद्या अजून एका स्त्रीविषयी
जिच्यामुळे जीवनाला कलाटणी मिळाली, पण थोडी विश्रांती.... उद्याची वाट पहावी लागेल
यासाठी.......
No comments:
Post a Comment