Thursday, 9 June 2016

वीज न वापरणाऱ्या डाॅ. हेमा साने यांची अनोखी कहाणी


अलीकडेच पर्यावरणदिन झाला सगळेजण मेसेज करत होते. कोणीतरी झाडे लावताना फोटो काढून सोशल मिडीयावर टाकत होते. तो दिवस संपला की सगळ संपल . पण संपूर्ण आयुष्य म्हणजे पर्यावरणदिन आणि त्यांची रक्षा करणे हा धर्म समजून रोज काम करणाऱ्या डॉ.हेमा साने या मात्र आपल्या सगळ्या पेक्षा वेगळ्या आहेत.

डॉ.हेमा साने यांची शिक्षण पाहिलं लक्षात येईल किती महान व्यक्तीबद्दल बोलत आहे. त्याचं शिक्षण आहे,  M.Sc, Ph.D. in Botany & M.A, M.Phil in Indology .त्यांच्या पाहिल्यावर वाटणार पण नाही त्या एवढ्या उच्चशिक्षित आहेत.


पुण्यातील वनस्पती शास्त्राच्या अभ्यासक डॉ.हेमा साने यांनी त्यांच्या बालपणापासून वीज वापरलीच नाही,त्यांच्या कामाबाबत  छोटीसी चित्रफित 'चल हवा येऊ द्याया कार्यक्रमात दाखवण्यात आली.ती पाहिल्यावर  या महान स्त्रीबद्दल आणखीन आदर वाटला.

आपल्या एवढ्या जवळ असून त्यांना भेटता आले यांची खंत वाटत राहिली.एम्प्रेस गार्डनमध्ये त्या एकदा लेक्चरसाठी आल्या होत्या. पण त्यादिवशी मला जाता आले नाही. भावाने माहिती दिल्यावर त्यांना भेटायची उत्सुकता अजून वाढली. पुढे आज उद्या करून राहून गेले.

त्या M.Sc, Ph.D. in Botany & M.A, M.Phil in Indology आहेत. तरीही  त्यांचा इतिहासाचादेखील गाढा अभ्यास आहे. त्यांनी गरवारे कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख म्हणून काम केलेले असून  त्या पाणी विहिरीवरून आणतात! आयुष्यात कधी वीज वापरली नाही किंवा टेलिफोन वापरलेला नाही. सदैव निसर्गाच्या सानिध्यात राहत असल्यामुळे वनस्पतीप्राणी पक्षी हे त्यांचे विश्व .त्यांच्या घरातसगळीकडे वेली,झाडेझुडपे दिसतात त्यामुळे आजूबाजूला सगळ्या प्राणी ,पक्षी कीटकांचा  मुक्त वावर दिसतो. यामुळेच त्यांनी  वनस्पती शास्त्राशी संलग्न काही पुस्तके लिहिली आहेत. तसेच काही  पाठ्यपुस्तके लिहिले तेही कंदिलाच्या उजेडात!

आता त्या सौर उजेचा दिवा वापरतात.नोकरीतील शेवटच्या दहा वर्ष  त्यांनी लुना वापरली तोपर्यंत त्या पायीच जात होत्या. त्यानंतरदेखील नोकरी व्यतिरिक्त इतरत्र त्या पायीच जात..!
हे सगळ वाचून आश्चर्य वाटत असेलआता पर्यंत त्यांना पाहिजे तसा त्यांचा सन्मान केला गेला नाही. किंवा त्यांच्या सखोल अभ्यास त्याबाबत दाखल घेतली गेली नाही. त्यांच घर शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे जागाकडे आशा लावून काहीजण बसले आहेत. घर हे नुसते घर नसून सर्व प्राणिमात्रांच्या आश्रयस्थान आहे.
त्यांच्या कामाची दाखल घेऊन झी मराठी वाहिनीने  त्यांना माई पुरस्कार देणार आहे. याचा आनंद आणि अभिमान वाटतो.
.
'साधी राहणी उच्च विचारसरणी'चे तंतोतंत उदाहरण असलेल्या वयाची ७५ वी ओलांडलेल्या या उच्चशिक्षित व प्रेरणादायी स्त्रीच्या निसर्गाप्रती समर्पणाला साष्टांग दंडवत! __/\__ 
आता मात्र लवकरच भेटायला जाईल.....


No comments:

Post a Comment