ब्लॉग लिहिण्याची फार वर्षापासून इच्छा होती. मुहूर्त मात्र आज लागला. शाळा, कॉलेज संपल्यावर नोकरीच्या शोधत आणि स्वताच्या शोधत काही वर्ष गेली. अजून जे हव ते मिळालं नाही यासाठी धडपड सुरु आहे. ते मी मिळवणार. पण आपल्याला नेमक काय हवं, हे कळायला पण काही काळ जावा लागतो. जेव्हा कळत कधी उशीर झाला असतो तर कधी लक्ष साध्य करायला वेळ उरलेला नसतो. तरीही एक दिवस आपला असेल अश्या आशेवर जीवनगाडी सुरु आहे कारण मी आशाची (आईच नाव आशा आहे) मुलगी आहे. इतक्या वर्षांनी हा सगळा खटाटोप करण्याचे कारण की मनात सतत सुरु असलेले विचार याला व्यासपीठ मिळाव.
आपल्याला काय हवं याच उत्तर शोधताना फक्त आपल्या गरजा (आवश्यक आहेत त्याच) भागून आई वडिलाला सुखी ठेवता येईल. मग कशाला बाकी खटाटोप म्हटलं आपल्या सारख्या गरजूंना सहकार्य करण्यासाठी आणि म्हणजे खऱ्या अर्थाने समाधानाने जीवन जगता येईल. कॉलेजमध्ये असताना आपल्याला लोकांचे दुख जाणून घ्यायला आणि त्यावर उपाय करण्यसाठी धडपडायला आवडते हे समजले.
यासाठी पत्रकारिता अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि तो सुरु असताना बचत गटच्या महिला यावर लेख मालिका लिहण्याची संधी मिळाली. रोज नवीन बचत गट त्याचे बारकावे, त्यातील महिला त्यांचा संसार, बचत गटाचे राजकारण, राजकारणात त्यांचा कामापुरता फायदा घेत असलेले राजकारणी, सगळ्यात महत्वाचे त्या महिलांची जगण्याची जिद्द, अनेक झोपडपट्टी राहून ही उत्तम बिझनेस वुमन झाल्या होत्या तर काहींचा प्रवास सुरु होता, मुलांच्या शाळा, सासू -सासरे आणि काही तर दारुड्या नवऱ्याचा मार खाऊन तर काही एकटीने संसाराचा गाडा अगदी खंबीरपणे ओढत होत्या. पहिल्यांदा त्यापण सर्वसामान्य महिलासारख्या लाजऱ्या, घाबरत होत्या परंतु ही त्यांची सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रगती बचत गटामुळे झाली होती. त्यामागे अनेकांचे परिश्रम होते. हे करत असताना या लेखमालिका आणि आर्थिक गणित यांचा भांडण झाल आणि शेवटी ती बंद पडली. मला मात्र खूप काही देऊन गेली. करीयरच्या सुरुवातीच्या काळात भरघोस अनुभव आणि माझ्या ध्येयाची वाट स्पष्ट करून गेली. काही दिवस आमच आर्थिक गणित बसवताना त्या बचत गटाच्या महिलावर महाविद्यालयातील प्रोजेक्ट केला. रोजचे काम वेगळ्या रूपाने मांडण्याचा आनंद तर होता त्यापेक्षा महिलांची प्रगती याविषयी जे लिहित होते त्याला आकडेवारीचा आधार मिळाला. ते पुस्तक म्हणून बाजारात आणण्याची इच्छा होती बघू आता कधी जमत ते.
कॉलेज संपले आणि आयुष्याचा अश्या प्रकारे एक अध्याय संपला. नवीन सुरुवात फार खडतर होती. पण जे मिळत आपल्यासाठी बेस्ट असत. यावर विश्वास ठेऊन कामाला सुरुवात केली. आणि खूप खूप उत्साहाने काम केले. दोन वर्ष अशी भूरकन उडून गेली. त्या कामात पेट्रोलचा खर्च मिळायला अवघड पण समाधान हे न मोजता येणार. ही अशी असते सच्ची पत्रकारिता. कामाची वेळ नव्हती, रात्री - बेरात्री, सकाळ, दुपार कधी पण गाडी घ्यायची आणि बातमी शोधत फिरायचं. मिळाली तर छान नाही तर पुन्हा शोधयात्रा ....
यावर लिहिण्यासारखं खूप आहे हळू हळू लिहित जाईल. ज्यांनी या दरम्यान मदत केली यांना आभारी म्हणयच होत पण कधी हा प्रश्न ही होत मग ठरवल आताच. आपल्या बिझी लाईफ मधून परत केव्हा वेळ मिळावा. हा ब्लॉग जरा स्वताविषयी होत पुढे मला भेटले गुणी माणस आणि मी पहिली ठिकाणे माझ्या नजरेतून
प्रयागा होगे
25/11/2014 ...